मुंबई

एअरपोर्टच्या अख्त्यारित रस्त्यावर खड्डे; रस्ते पालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्टीय विमानतळाकडे जाणा~या ४ मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेली आहेत. ही खड्डे बुजविण्याकडे अदानी विमानतळ प्रशासन यांचे दुर्लक्ष असल्याने देश व परदेशांतून आलेल्या पाहूण्यांचे खड्डयांतून प्रवास करावा लागतो. एअरपोर्ट प्रशासनाच्या अख्त्यारित असलेले ही चार रस्ते मुंबई महापालिकाकडे हस्तांतरित करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून वाॅचडाॅग फाऊंडेशनकडून केली जात आहे.

विमान विमानतळाकडे जाणारे सहार कार्गो रोड, सहार एअरपोर्ट रोड, बामणपाडा एमसी छागला मार्ग आणि ताज स्टार फाईन किंचन येथील रस्त्यावर हजारो खड्डे पडलेले आहेत. या खड्डयांकडे अदानी एअरपोर्ट प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने खड्डयांची संख्या वाढत आहे. याप्रकरणी पालिका के.पुर्व विभागाने विमानतळ प्राधिकरणाला पत्रही दिले आहे. परंतु त्यांचीही दखल घेण्लात आली नाही.
येथील चार रस्ते सन २००६ पासून मुंबई विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीकडे आहेत. ते मुंबई महापालिकाकडे हस्तांतरित न केल्याने त्यांची देखभाल व दुरूस्ती होत नाही. यामुळे प्रत्येक पावसाळ्यात पडणा~या खड्डयांचा मनस्ताप हा सहार गावातील नागरिकांसह परराज्यातून येणा~या प्रवासी व कार्गो वाहनचालकांना होत आहे. महापालिकाकडे सदर रस्ते हस्तांतरित करण्यासाठी वाॅचडाॅग फाऊंडेशनचे ट्रस्टी निकलोस अल्मेडा यांनी अनेक वेळी आंदोलने व पत्र व्यवहार केली. परंतु विमानतळ प्राधिकरण त्यांची दखल न घेतल्याने नाइलाजाने
नागरिकांना खड्डयांतून प्रवास करावा लागत आहे.
लक्ष वेधण्यासाठी खड्डयांना ही नावे दिली :-
मुंबई महापालिका आणि विमान प्राधिकरण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी निकलोस अल्मेडा यांनी गौतम अदानी असे खड्डेमय रस्त्याला नाव दिले आहे. यापुर्वीसुध्दा अल्मेडा यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अजोय मेहता याचे नाव देवून अनोखे आंदोलन केले होते.
विमानतळ परिसरातील खड्डेमय रस्त्यावरून दररोज १० ते २० लाख रुपयांचा कार्गो वाहनचालकांकडुन टोल वसूल केला जातो.परंतु त्यांना होणा~या त्रासाकडे मात्र विमानतळ प्राधिकरणाकडून प्रत्यक्षपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. खड्डयातून प्रवास करणारे दुचाकी व रिक्षाचालकांचा नाहक बळी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तरीसुध्दा सर्वपक्षीय युनियन पदाधिकारी दुर्लक्ष करत आहेत. ट्रान्सपोर्टच्या नावाखाली वाहनचालकांकडून पावत्या फाडण्याचे काम करता, असा आरोप निकलोस अल्मेडा यांनी यावेळी केला.
हे रस्ते विमानतळ प्राधिकरणाच्या अख्त्यारित :-
विमान विमानतळाकडे जाणारे सहार कार्गो रोड, सहार एअरपोर्ट रोड, बामणपाडा एमसी छागला मार्ग आणि ताज स्टार फाईन किंचन रस्ता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close