मुंबई

वेदान्त-फाॅक्सकाॅननंतर आता “फोन पे”चे कार्यालय मुंबईतून कर्नाटकाला हलविले

महाराष्ट्रातून वेदान्त-फॉक्सकॉननंतर  आता फोन पेचे कार्यालय कर्नाटकाला हलविण्याचा निर्णय झाला आहे. त्यासंदर्भातील कंपनीची जाहिरात गुरुवारी वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द झाल्या आहे. वेदान्त-फॉक्सकॉन
प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन राज्यातील सत्ताधारी विरुद्ध विरोधकांमध्ये अजूनही वाद सुरु असतांना पुन्हा राज्याला आणखी एक धक्का बसला.
 असा वाद सुरु असतानाच आता अन्य एका मोठ्या कंपनीने आपला तळ राज्याबाहेर हलवल्याची माहिती समोर येत आहे.फोन पेचे मुंबईतील अंधेरी येथील स्थायिक असलेले कार्यालय कर्नाटकामध्ये हलविण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी वृत्तपत्रामध्ये छापलेल्या एका नोटीसच्या आधारे आपल्या ट्विटर हेडलवर टाकली आहे. यामुळे विरोधकांना सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा मुद्दा मिळाला आहे.
“‘फोनपे’ डेबिटेड फॉर्म महाराष्ट्र, क्रेडिटेड टू कर्नाटक” या मथळ्याखाली रोहित पवार यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. रोहित यांनी एका चारोळीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. “‘वेदान्त’नंतर ‘फोनपे’ची बारी… गब्बर होतायेत शेजारी… महाराष्ट्र पडतोय आजारी… व्वा रे सत्ताधारी” अशी चारोळीही रोहित यांनी या नोटीसच्या फोटोसोबत पोस्ट केली आहे. तसेच महाराष्ट्र सर्वाधिक कर देणारं राज्य असूनही येथील तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागत असल्याचं सांगताना, ” टॅक्समध्ये महाराष्ट्र करतो सर्वाधिक पे… महाराष्ट्राच्या युवांना मात्र बेरोजगारीचा वे” असं रोहित यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 कंपनीच्या नोटीसमध्ये काय आहे?
‘फोनपे’चे संचालक आदर्श नहाटा यांनी कंपनीच्या वतीने जारी केलेल्या या नोटीसमध्ये, कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राहण्यात बदलण्यासाठी कंपनी कायदा, २०१२ च्या कलम १३ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्यात आला आहे. ज्यासाठी कंपनी मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये फेरफार करण्यासंदर्भात १६ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात आलेल्या आमसभेत विशेष ठराव मंजूर करण्यात आला आहे,” अशी माहिती दिली आहे. तसेच कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्ताविक बदलामुळे कोणत्याही व्यक्तीचे हित प्रभावित होण्याची शक्यता असेल तर ती व्यक्ती एमसीए-२१ वर गुंतवणूकदार तक्रार फॉर्म दाखल करु शकते. विरोधाच्या कारणासाठीचे पत्र प्रादेशिक संचालक, पश्चिम विभागाकडे एव्हरेस्ट पाचवा मजला १०० मरीन ड्राइव्ह, मुंबई येथील कार्यालयावर पाठवावे. ही सूचना प्रकाशित झाल्याच्या १४ दिवसांच्या आत अर्जदार कंपनीला त्याचा प्रतिसहीत नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवू शकते, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय आता कर्नाटकला हलवण्यात येणार असल्याने यासंदर्भातील ही सूचना गुंतवणूकदारांना देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close