मुंबई

नवरात्रोत्सवात ९ दिवस गरबा खेळण्यासाठी १२ वाजेपर्यंतची परवानगी द्या; आ.सुर्वेची मागणी

कोरोनाचे संकट दूर होऊन यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा
करण्यात आला. आता मुंबई सह राज्यात नवरात्रोत्सवाची तयारी मोठ्या जल्लोषात करण्यात येत आहे. सोमवार,२६ सप्टेंबर ते मंगळवार ४ ऑक्टोबर पर्यंत या ९ दिवस मुंबई सह राज्यात  ठिकठिकाणी नवरात्रौत्सवात गरबा-दांडीयाचे आयोजन जल्लोषात आयोजन केले जाणार आहे. यामुळे राज्य सरकारने ९ दिवस १२ वाजेपर्यंत गरबा खेळण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्री एकथान शिंदे यांच्याकडे केली आहे.
गुजराथ, राजस्थान व इतर राज्यात जशी नऊ दिवस
मध्यरात्री १२ वाजेपर्यंत गरबा-दांडीयाला परवानगी दिली जाते. त्याप्रमाणे नागरिकांनी हा उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी व गरबा खेळण्यासाठी या नऊ दिवसांत १२ वाजेपर्यंत मुंबईसह राज्यात परवानगी द्यावी अशा विनंतीचे निवेदन आमदार तथा विभाग क्र.१ चे विभागप्रमुख प्रकाश सुर्वे यांनी सोमवारी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close