मुंबई

माऊंट मेरी जत्रेसाठी मुंबई महापालिका सज्ज

दोन वर्षांनंतर साजरी होणा~या माऊंट मेरी जत्रेसाठी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. वांद्रे पश्चिमेकडे साजरी होणा~या या जत्रेची तब्बल १०० वर्षांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा असलेली ही जत्रा ‘मोत माउली’ ची जत्रा आणि वांद्रे महोत्सव म्हणून देखील ओळखले जाते. यंदा दोन वर्षानंतर आयोजित होणाऱ्या यात्रेला दररोज एक लाखांपेक्षा अधिक भाविक भेट देतील अशी अपेक्षा आहे. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डाॅं.इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीवकुमार यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सह आयुक्त रणजीत ढाकणे यांच्या देखरेखीखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच पश्चिम’ विभागाद्वारे विविध नागरी सेवा सुविधांबाबत सुयोग्य तयारी करण्यात आली असून भाविकांच्या सेवेसाठी महानगरपालिका सुसज्ज आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच युट्युब, ट्विटर यासारख्या समाज माध्यमांद्वारे या यात्रेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘एच पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली आहे.
 माऊंट मेरीची यात्रा यंदा  ११ ते १८ सप्टेंबर या दरम्‍यान संपन्‍न होणार आहे. गेली दोन वर्षे म्हणजेच सन २०२० व २०२१ मध्ये ‘कोविड-१९’ या साथ रोगाच्या प्रादुर्भावामुळे या यात्रेचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र, या साथ रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या विविध उपायोजना आणि प्रभावीपणे राबविलेली लसीकरण मोहीम यामुळे यंदा कोविड संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात आहे.
पालिकेने केलेली तयारी –
• बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे या परिसराच्या देखरेखीकरीता १०० पेक्षा अधिक ‘सीसीटीव्‍ही’ कॅमेरे बसविण्‍यात आले आहेत.
• यात्रेला येणाऱ्या भाविकांना पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
• परिसराच्या स्वच्छतेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एक पश्चिम विभागात तील घनकचरा व्यवस्थापन खात्याचे कामगार, कर्मचारी व अधिकारी अव्याहतपणे कार्यरत आहेत.
• ओल्‍या सुक्‍या कच-याची विल्‍हेवाट योग्य प्रकारे व्हावी, यासाठी या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
• भाविकांच्या सुविधेसाठी फिरत्या शौचालयांची व्यवस्था देखील या परिसरात पुरेशा प्रमाणात करण्यात आली आहे.
•  उच्‍च न्‍यायालयाने निर्देशित केल्‍याप्रमाणे पूजेचे साहित्‍य, खेळणी इत्‍यादींच्‍या विक्रीसाठी माऊंट मेरी रोड, सेंट दि जॉन बॅप्‍टीस्‍टा रोड व केन रोड या ठिकाणी तात्‍पुरत्‍या पिचेसची लिलाव प्रक्रिया पूर्ण करुन सामान्‍य जनतेस व स्‍थानिक नागरीकांना या तात्‍पुरत्‍या जागा यात्रेच्‍या कालावधीत उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्‍या आहेत.
• या परिसरात अनधिकृत स्‍टॉल्‍स, अनधिकृत फेरीवाले यांना मज्‍जाव करण्‍यात आला आहे.
• बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एक पश्चिम विभागाद्वारे या ठिकाणी उभारण्यात आलेला नियंत्रण कक्ष हा यात्रा कालावधी दरम्यान अव्याहतपणे २४ तास कार्यरत राहणार आहे.
• आवश्यकतेनुसार भाविकांना वेळच्या वेळी प्रथमोपचार व वैद्यकीय सेवा सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने या ठिकाणी प्रथमोपचार कक्ष उभारण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close