मुंबई

पालिकेत पुन्हा एकदा दोन उपायुक्तांच्या बदल्या

मुंबई महापालिकेत गेल्या काही दिवसांपुर्वीच ए वाॅर्डच्या उप आयुक्त चंदा जाधव यांची घनकचरा व्यवस्थापन विभागात बदली केल्यानंतर गुरुवारी पुन्हा महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंग चहल यांनी दोन उप आयुक्तांच्या बदल्या केले. यामुळे आता मुंबई महापालिकेत सहाय्यक आयुक्ताच्या बदल्यानंतर उप आयुक्तांच्या बदल्यांनी जोर धरला आहे. गुरुवारी मुंबई महापालिका परिमंडळ – २ चे उप आयुक्त हर्षद काळे यांची बदली मध्यवर्ती खरेदी खाते विभागात करण्यात आली. तर खरेदी खाते विभागातील उप आयुक्त रमाकांत बिरादार यांची परिमंडळ – २ व प्रकल्प संचालक, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेच्या प्रकल्प संचालक पदी या नियुक्ती करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त  चहल यांनी उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ.संगिता हसनाळे यांची बदली परिमंडळ एकच्या उपायुक्तपदी केली होती, तर उपायुक्त (परिमंडळ १)चंदा जाधव यांची बदली उपायुक्त(घनकचरा व्यवस्थापन)पदी केली. परंतु तीन दिवसांमध्ये ही बदली रद्द करून डॉ.संगिता हसनाळे यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापनासह परिमंडळ एकच्या उपायुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र सध्या संगिता हसनाळे या सुट्टीव असल्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाचा अतिरिक्त कारभार उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांच्याकडे आहे. तर चंदा जाधव यांच्याकडे परिमंडळ एकचा तात्पुरती पदभार आहे. परंतु हसनाळे सेवेत परतल्यानंतर चंदा जाधव यांना कोणत्या विभागात पाठविणार हा आयुक्तासमोर प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close