राजकिय

शिंदे – फडणवीस सरकारमध्ये उत्तर मुंबईतील आमदारांना मंत्री मंडळात डच्चू

राज्यात सत्तांतर होवून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले. या सरकारचा एक महिन्यांनंतर मंगळवारी पहिले मंत्रीमंडळ स्थापन झाले. मात्र या मंत्री मंडळामध्ये उत्तर मुंबई जिल्ह्यातील ६ आमदारांपैकी एकाही आमदारांना मंत्री पद देण्यात आलेले नाही. यामुळे या सर्व आमदारांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे.
उत्तर मुंबई जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. माजी खासदार राम नाईक यांच्या राजकीय कारकिर्दीपासून या जिल्ह्यामध्ये भाजपाचे वर्चस्व असून भाजपाचे विधान सभेतील ४ आणि विधान परिषदेचे २ असे एकूण ६ आमदार आहेत. यामुळे पहिल्या मंत्रीमंडळात उत्तर मुंबई जिल्ह्यातील कुठल्यातरी एका आमदाराला मंत्री पदाची लाॅटरी लागेल. अशी भाजपा कार्यकर्त्यांसह पदाधिका~यांची महिनाभरांपासून चर्चा होती. मात्र या चर्चाला सोमवारीचं पुर्णविराम मिळाला.
शिंदे – फडणवीस सरकारमध्ये मंत्री पद मिळण्यासाठी  उत्तर मुंबईतून भाजपाचे विधान परिषदेचे आमदार तथा माजी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार मनिषा चौधरी, आमदार अतुल भातखळकर यांची नावे चर्चेत होती. तसेच हे तिन्ही आमदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. परंतु त्यांना पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये संधी न दिल्याने आता भाजपामध्येचं उलटसूलट चर्चा असून कार्यकर्त्यांमध्येसुध्दा नाराजीचा सूर आवळला जात आहे.
सन २०१४ च्या भाजपा – शिवसेना युतीमध्ये बोरिवली विधानसभा मतदार संघाचे आमदार विनोद तावडे यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले होते. तर शेवटच्या विस्तारामध्ये चारकोप विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश सागर यांचीही राज्यमंत्री पदी वर्णी लावली होती. यामुळे त्यावेळी उत्तर मुंबई जिल्ह्यात दोन मंत्री होते. मात्र आताच्या शिंदे – फडणवीस सरकारमध्ये पहिल्या मंत्रीमंडळात उत्तर मुंबईतील आमदारांना डावलण्यात आले.
याविषयी भाजपाच्या एका आमदाराशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, आमचे मिलीजुली सरकार आहे. यामुळे आम्हाला मंत्री पद जरी मिळाले, नसले, तरी आम्ही समाधानी आहोत. मात्र पुढील विस्तारामध्ये नक्कीचं संधी मिळेल, असा दावा त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close