मुंबई
दहिसरमध्ये राष्ट्रीय महापुरुषांच्या चित्रांची दुर्दशा
दहिसर येथील आनंद नगर मधील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाखालील दोन्ही बाजूंच्या मोकळी जागेत भितीवर रेखाटलेल्या क्रांतीकारक व महापुरुषांच्या चित्रांची दुर्देशा झाली आहे. या चित्रांसमोर डेब्रिज, चिखल व माती साचलेली आहे.
दीनदयाल बहादूर या नावाने पब्लिक गार्डन बनविण्यात आले होते. त्या मध्ये झूले, सुशोभिकरणासह मुलासाठी खेळणीची साहित्य, रंगीत रोषणाईने, फवारा व लाकडी बेंच लावण्यात आले होते. तसेच परिसरात पूलाच्या प्रत्येक पिलर्सवर राष्ट्रीय महापुरुषच्या नाव व माहिती दिलेली चित्र रेखाटलेली आहेत. यामध्ये झाँसीची राणी लक्ष्मीबाई, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, सरदार वल्लभभाई पटेल, वीर सावरकर, वीर शहीद भगतसिंग, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेबआंबेडकर, पंतप्रधान इंदिरा गांधी, राष्ट्रपती डॉ .अब्दुल कलाम, अंतरिक्षवैज्ञानिक कल्पना चावला, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची चित्रे साकारलेली आहेत.
भिंतीवर रेखाटलेल्या चित्रातील काही महापुरुषांच्या चित्रांखाली व माहितीखाली मातीचे डेब्रिज, चिखलाने क्षतिग्रस्त झाले आहेत. देशात एकीकडे आझादीचा अमृत महोत्सव साजरा होत आहे, तर दुसरीकडे स्वतंत्रवीरांच्या चित्रांचा अशाप्रकारे अपमान होत असल्याने सदर जागा तात्काळ स्वच्छ करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता राजेश पंड्या यांनी केली.
येथील पब्लिक गार्डन लोकार्पणानंतर दीड ते दोन वर्षांतच मेट्रो रेल्वे प्रोजेक्टच्या कामासाठी हा संपूर्ण गार्डन उध्वस्त करण्यात आले होते. मेट्रो रेल्वे सुरु झाल्यानंतरसुध्दा पूलाखालील माती ढिगारा, ठिकठिकाणी पसरलेला कचरा एमएमआरडीए व पालिका प्रशासनाने उचललेला नाही.