राजकिय

मुख्यमंत्री शिंदेचा शिवसेनेला धक्का; १४ खासदार शिंदेच्या गळ्याला!

शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. शिंदे यांनी शिवसेना पक्षातील १४ खासदार शिंदे गटात सामील करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. या १४ खासदारांसोबत शिंदे यांची नुकतीच व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे चर्चा झाल्याची माहिती सूत्राकडून दिली जात आहे. यामुळे आमदारांनंतर आता खासदार शिंदेच्या गळ्याला लागणार असल्याचे समजते.
एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारणी बरखास्त करत नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर, दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. बुधवारी सुप्रीम कोर्टात होणा~या शिंदे यांच्याविरोधातील याचिकेच्या निर्णयाआधीचं शिंदे गटानी ही राजकिय खेळी खेळली आहे. यामुळे शिवसेना कुणाची ठाकरेची की शिंदे गटाची असा सामना आता रंगलेला दिसून येत आहे.
शिंदे गटाच्या नवीन कार्यकारणीमध्ये नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. या दोघांचीही काही तासांपूर्वीच शिवसेनेतून पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणाखाली हकालपट्टी करण्यात आली होती. तर उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
शिवसेनेची राष्ट्रीय पातळीवरची फूट उद्याच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे यांची नेमणूक केली जाणार असून प्रतोदपदी भावना गवळी कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना १९ जुलै रोजी दिले जाणार आहे. लोकसभेत बारा खासदारांना घेऊन मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे. .
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर शिंदे गटातील आमदारांची बैठक ट्रायडेंट हॉटेलमध्ये पार पडली. या आमदारांच्या बैठकीत शिवसेनेच्या काही खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली होती. मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे १४ खासदार शिंदे गटात सामिल होणार असल्याची चर्चा सुरू होती. ती आज खरी होतांना दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close