राजकिय

आ. प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तुळशी रोप

आषाढी एकादशी निमित्त सेवाभावी उपक्रम

भाजपचे नेते व आमदार प्रविण दरेकर यांनी आज आषाढी एकादशी निमित्त मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील देवीपाडा येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन श्री विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेतले व भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी  विठ्ठल रखुमाई मंदिरा जवळ  दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तुळशी रोप वाटप करण्यात आले.
भाजपा मागाठाणे विधानसभा वॉर्ड क्रमांक १४ येथे  आषाढी एकादशीच्या निमित्ताने विविध ठिकाणी भाजपचे नेते, आमदार दरेकर यांच्या हस्ते तुळशी रोप वाटप करण्यात आले. दिंडीच्या निमित्ताने परमार्थाचा आनंद घेण्याची संधी या परिसरातील भाविकांनी उपलब्ध करुन देण्यात आली. संत परंपरा जपण्यासाठी येथील वारकरी बांधवांना दरेकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या दिंडीमध्येही दरेकर सहभागी झाले. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना दरेकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार आता ख-या अर्थाने महाराष्ट्राचा विकास करेल. राज्याला नक्कीच प्रगतीला दिशेने हे सरकार घेऊन जाईल. महाराष्ट्राला आता सुजलाम सफलाम करण्यासाठी आशिर्वाद देण्याची प्रार्थना दरेकर यांन विठ्ठल-रखुमाई यांच्या चरणी घातले.
यावेळी मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, माजी नगरसेविका आसावरी पाटील, जिल्हा सचिव मोतीभाई देसाई, जिल्हा उपाध्यक्ष रवी जुवळे, मंडळ अध्यक्ष दिलीप उपाध्याय, मंडळ महामंत्री विकी चोगुले, महिला मंडळ अध्यक्षा रश्मी भोसले, महादेव रसाळ, महेश दाभोळकर, कार्यक्रमाचे आयोजक वॉर्ड अध्यक्ष स्वप्नील देसाई व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
उत्तर मुंबई भाजपा युवा मोर्चाच्या वतीने डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त बोरीवली (प) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी या शिबिराला आमदार प्रविण दरेकर यांनी भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचे आभार मानले.
 या प्रसंगी आमदार योगेश सागर,मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, आमदार योगेश सागर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा योगिता पाटील, माजी नगरसेविका बिना जोशी, माजी नगरसेविका सुनीता यादव, आयोजक उत्तर मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष अमर शहा आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close