राजकिय

ज्याना मोठे केले, त्यांनीचं पाठीत खंजीर खूपसला; मागाठाणेत आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा

ज्याना आपण मोठे केले, कार्यकर्त्यांची जबाबदारी दिली, अशाच लोकांनी आज पाठीत खंजीर खूपसविल्याची घणाघाती टिका माजी मंत्री तथा युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मागाठाणे विधानसभा मतदार संघात आयोजीत केलेल्या निष्ठा यात्रामध्ये केली. ते कांदिवली येथील सिंग इस्टेटमधील शाखा क्र.२७ येथील निष्ठा यात्रा कार्यक्रमात बोलत होते.
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेला पुन्हा नव्यानं उभारी देण्यासाठी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदार संघातील शाखा आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी निष्ठा यात्राची घोषणा करून पक्ष बांधणीसाठी शिवसैनिकांशी वैयक्तिक पातळीवर जाऊन संपर्क साधणे सुरु केले आहे. या संपर्काचा एक भाग म्हणून रविवारी आदित्य ठाकरे कांदिवली, बोरिवली व दहिसर याठिकाणी असलेल्या शाखांना भेटी देवून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
  यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यांनी ज्यांना परत यायचंय त्यांच्याकरता मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत. जे पळून गेलेत त्यांच्यातही दोन गट आहेत. ते लवकरच समोर येईल, विधान करून बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा आव्हान दिले. तर
काही बंडखोर आमदारांच्या राक्षसी महत्वाकांक्षा आहोत. मात्र काही आमदारांना जबरदस्ती नेले गेले. असा दावाही त्यांनी केला. तसेच तुम्हाला थोडी जरी लाज, हिंमत उरली असेल, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा, असं आव्हान देखील  बंडखोर आमदारांना आदित्य यांनी दिले.
यावेळी निष्ठा यात्रामध्ये विभागप्रमुख विलास पोतनीस, शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती
विनोद घोसाळकर, माजी नगरसेवक, शाखा प्रमुख, गटप्रमुखसह शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close