राजकिय

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा अखेर राजीनामा; फेसबुकद्वारे नागरिकांशी साधला संवाद

गेल्या आठ दिवसांपासून शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाच्या आमदारांकडून सुरू असलेले राजकीय नाट्य आणि सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निकालाचा कौल लक्षात घेवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुधवारी मंत्रीमंडळाची बैठक संपन्न झाल्यानंतर रात्री ९.३० वाजेच्या सुमारांस मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी फेसबुक लाईव्ह करून राज्यातील जनतेशी संवाद साधला.
या फेसफुक लाईव्ह संवादामध्ये ना.उध्दव ठाकरे म्हणाले मी आश्वस्त केले होत जे सुरु केलय ते सुरु राहील. आता पर्यंतची वाटचाल तुमच्या मदतीने पुर्ण केली. सरकार म्हणून अनेक कामे केली. बळीराजाला कर्जमुक्त केले. आपण विसरणार नाही. मला समाधान आयुष्य सार्थकी लागले.औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण आज केले. शिवाय उस्मानाबादचे धाराशिव केले. सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची जागा दिली. एखादी गोष्ट चांगली सुरु असली की दृष्ट लागली. पवारसाहेब, सोनियाजी सहकार्याबद्दल धन्यवाद मानले. आजच्या कॅबिनेटला चारच शिवसेनेची मंत्री होते.
अनेकांना शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी मोठे केले ज्यांना मोठे केले तेच विसरले. जे देणे शक्य होते ते सगळ दिल. मातोश्रीला अनेक लोक येऊन पाठिंबा देतायत. ज्यांना दिल ते नाराज ज्यांना काहीच मिळाले नाही ते सोबत हीच शिवसेना सामान्यांच्या पाठिंब्याने सुरु आहे.
न्याय देवतेने निकाल दिला. फल्ोअर टेस्ट करण्याचा जो निर्णय झाला. तो राज्यपालांनी २४ तासात लोकशाहीचे पालन केले पण १२ विधानपरिषद यादी आताही निर्णय घ्यावा. मंत्रिमंडळ बैठकीत अशोकराव म्हणाले आम्ही बाहेर पडतो. काल पण आवाहन केले तुमची नाराजी कोणावर आहे? ति सुरतला गुवाहटीला जाऊन सांगण्यापेक्षा मातोश्री समोर येऊन बोला. मला समोरासमोर हवय. त्यांच्याशी वाद नकोय. मुंबईत बंदोबस्त वाढवला स्थानबध्द करत नोटीस आल्या. चीन सीमेची सुरक्षा कदाचित मुंबईत, इतक नाते तोडले. कुणीही शिवसैनिकांनी यांच्यामध्ये येऊ नये. नविन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. मी सांगतो तुमच्या मध्ये कुणी येणार नाही. किती आमदार आहे लोकशाहीत डोकी फक्त मोजण्यासाठी होतो. माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तर मला लाजिरवाणे वाटणार नाही. मला उद्याचा खेळच करायचा नाही. शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खाली खेचण्याचे पुण्य त्यांना पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही. असे भावनिक खंत मुख्यमंत्र्यानी व्यक्त केली.
 मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांचा आनंद त्यांना पेढे खाऊ द्या मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय. वारकरी म्हणतात उध्दव ठाकरेंच्या हस्ते हवीय. माऊली म्हणतील ते मान्य. महाराष्ट्रात दंगल झाली नाही. मुस्लिमांनी पण ऐकले. मी आलो अनपेक्षितपणे जातो पण तसाच आहे. आता यापुढे नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे. शिवसेनेला कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. सोबत विधान परिषद सदस्याचा पण राजीनामाही देत आहे. मी पुन्हा येईल अस बोललो नव्हतो. सर्वांचे शासकीस कर्मचारी सहकार्यां केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close