शैक्षणिक

कांदिवलीत शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वितरण

कांदिवली पुर्वकडील अशोक नगर, दामोदरवाडी हाॅल येथे शाळकरी विद्यार्थ्यांसाठी कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित आणि शिवप्रताप प्रतिष्ठानच्या सौजन्याने १९ जून रोजी शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमांत कांदिवली पूर्व वडारपाडा, बाणडोंगरी, सोलापूर जिल्हा मित्र मंडळ, संभाजी नगर, नरसीपाडा, रामनगर परिसरातील सुमारे १३०० गरजू मुलांना शालेय शिक्षण साहित्याचे किट वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम कांदिवली पुर्व विधानसभा आमदार अतुल भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी कार्यक्रमामध्ये १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना उत्कृष्ट पारितोषिक देण्यात आल्याची माहिती शिवप्रताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण साळुंखे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close