टाॅप न्यूज

त्रिरत्न बुद्ध विहाराचा १५ वा वर्धापन दिन संपन्न

मेढे बौद्ध विकास मंडळ मुंबई व ग्रामीण आदर्श महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिरत्न बुद्ध विहाराचा १५ वा वर्धापन दिन आणि तथागत भगवान गौत्तम बुद्ध यांची 2566 वा जयंती व बोधिसत्व भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचा 131 वी  संयुक्त जयंती महोत्सव गावं, मेढे तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे नुकतीच संपन्न झाली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण प्रकाश कमलाकर जाधव, ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष यशवंत महादू जाधव, मुंबई कमिटीचे उपाध्यक्ष प्रताप सखाराम जाधव, सरचिटणीस भाई तथा दिपक जानू जाधव, उपचिटणीस कुमार चांगा जाधव, खजिनदार विजय विश्राम यादव,  सल्लागार शिवाजी रामा जाधव,माजी खजिनदार बबन गणू जाधव, मुंबई कमिटीचे माजी सरचिटणीस दिपक गोपाळ जाधव , ग्रामीण कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम तुकाराम जाधव, चिटणीस पांडुरंग सखाराम यादव, प्रिन्सिपल शैलेश शांताराम जाधव, डॉ, तुषार कुमार जाधव, डॉ, रीच्या तुषार जाधव, आदर्श महिला मंडळाच्या चिटणीस प्रियांका पांडुरंग जाधव उपस्थित होत्या.
 याप्रसंगी प्रकाश जाधव यांनी भगवान गौत्तम बुद्ध धम्म आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडून मार्गदर्शन केले तर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन भाई जाधव यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close