टाॅप न्यूज

एरपोर्टच्या जमिनीवरील झोपडीधारकांच्या सर्व्हेला विरोध; एसआरएला अधिकार नसल्याचा दावा

मुंबई आंतरराष्टीय विमानतळालगत असलेल्या केंद्र सरकारच्या जागेवरील क्लास्टरमध्ये मोडणा~या
झोपडपट्टीतील झोपडीधारकांचा बायोमेट्रिक सर्व्हे करण्यास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने नोटीसीद्वारे सर्व्हेक्षण करण्यास सुरुवात केली होती. मात्र अशाप्रकारे सर्व्हेक्षण करण्यास एसआरए प्राधिकरणास अधिकार नसल्याचा लेखी दावा माजी नगरसेवक निकलोस अल्मेडा यांनी केल्यानंतर सदर सर्व्हेक्षण थांबविण्यात आले असून झोपडीधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
येथील सर्व्हे नं.१४५, १४५ (ए) हे ३०८ एकर जमिनीवर सहार गावातील चर्च पखाडी, शांतीनगर, आनंद नगर, भवानी नगर, दुर्गानगर, सुतार पखाडी, तलावपखाडी आदी झोपडपट्टीबहूल विभाग येतात. यामध्ये चर्चपखाडी, टॅक पखाडी सुतार पखाडी हे गावठाणमध्ये मोडतात. यानासुध्दा एसआरए विभागाने नोटीस पाठविल्या होत्या. मुळात गावठाण आणि कोळीवाडा या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू होत नाही, मग नोटीसा कशा पाठविल्या, असा सवाल गावठणातील झोपडीधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
सहार गावातील जमिन ही एअरपोर्ट केंद्र सरकारची अर्थात एअरपोर्ट अॅथोरिटी यांच्या मालकीची आहे. यामुळे कायद्याने सदर ठिकाणी राज्य सरकारला केंद्राची किंवा एअरपोर्ट अॅथोरिटीची मंजुरी शिवाय झोपड्यांचा बायोमेट्रिक सर्व्हे करता येवू शकत नाही. तरीसुध्दा खाजगी एजन्सीद्वारे एसआरए प्रशासनाने झोपड्यांचा सर्व्हे करणे सुरु केला होता. त्यांला वाॅचडाॅग फाऊंडेशन आणि स्थानिकांनी अखेर हाणून पाडला.
सहार गावातील सर्व्हे नं.२६२ येथील घर आर्थर फिलीफ अल्मेडा यांच्या मालकीचे असून ते गावठाणमध्ये येते. मात्र एसआरए प्रशासनाने त्यांनासुध्दा नोटीस दिली होती. अल्मेडा यांनी ही चूक एसआरए प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी संपुर्ण सहार गाव आणि एअरपोर्ट जमिनीवरील झोपड्यांचा बायोमेट्रिक सर्व्हे सध्या थांबविला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close