राजकिय

कांदिवली अभिनेत्री निशा परूळेकर यांच्यावतीने लोकोपोयोगी वस्तूचे वितरण

मुंबई : प्रतिनिधी
भाजपा चित्रपट कामगार आघाडी महाराष्ट उपाध्यक्षा तथा अभिनेत्री निशा परूळेकर यांच्या १९ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या वाढदिवसानिमित्त मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील कांदिवली येथील प्रभाग क्र.२५ मधील जानूपाडा, पांडे कंपाऊंड याठिकाणी विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी येथील रिक्षाचालकांना मोफत सीएनजी गॅसचे वितरण, विभागातील रहिवाशांना घरोघरी जाऊन डस्टबिनचे वाटप आणि ठाकूर व्हिलेज  येथील रहिवाशांना मॉर्निंग वाॅक किटचे वाटप अभिनेत्री निशा परूळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला वाॅर्ड क्र. २५ चे वाॅर्ड अध्यक्ष लक्ष्मण  यादव, प्रसाद  प्रभू, दिलीप सावंत, जयेश गोलतकर, दिलीप काणेकर, उत्तम जाधव आणि भाजपा पदाधिकाऱी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close