मुंबई

मान्सूनपुर्व गटार सफाईचा गाळ, कचरा रस्त्यावरचं पडून; पालिकेला उचलण्यास मुर्हूत मिळेना

मुंबई महापालिकेकडून खाजगी कंत्राटदारांच्या कामगारांकडून युध्द पातळीवर मान्सूनपुर्व गटारीतील गाळ, कचरा साफ करणे सुरु आहे. तर अनेक ठिकाणी गटारीतील गाळ सफाईचे काम पुर्ण झालेले आहे. मात्र अशा अनेक ठिकाणी गटारीतील उपसलेला गाळ आणि कचरा रस्त्यांवर गेल्या १५ ते २० दिवसांपासून पडून आहे. तो उचलण्यास पालिकेच्या विभाग कार्यालयातील प्रशासनास किंवा कंत्राटदारांना वेळ मिळेना झाला आहे. यामुळे रस्त्याने ये – जा करणा~या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
मुंबईत महापालिकेचे २४ विभाग कार्यालय आहे. तर २२७ वाॅर्ड आहेत. या वाॅर्डातील प्रत्येक वस्त्या व  रस्त्यावरील पदपथाखाली असलेली गटारे, चाळीतील गटारे आदींची पालिकेच्या विभाग कार्यालयाकडून मान्सूनपुर्व सफाई केली जाते. परंतु ही सफाई केल्यानंतर गटारीलगत टाकण्यात आलेला कचरा व गाळ तसाचं ठेवल्याने तो पुन्हा गटारीमध्ये जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी कचरा व गाळ सुकल्याने तो हवामध्ये उडत असून रस्त्यावर इतरत्र पसरत आहे. याकडेसुध्दा पालिकेच्या विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्त, परिरक्षण विभागातील सहाय्यक अभियंता यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असून त्यांना साचलेल्या कचरा व गाळ उचलण्यास मुर्हूत मिळेनासा झाला आहे.
आयुक्तासह पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली
मुंबईतील मान्सूनपुर्व नाले, गटार सफाईसह विविध पावसाळी कामांची मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बलसिंग चहल आणि पर्यावरण तथा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपुर्वी महापालिका मुख्यालयात मान्सूनपुर्व कामांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये नाले व गटार सफाईतील गाळ व कच~याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश दिले होते. परंतु पालिका विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्त आणि घनकचरा विभागातील सहाय्यक अभियंतांसह इतर अधिका~यांकडून महापालिका आयुक्त आणि पालकमंत्री यांच्या आदेशाला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे.
अनेक ठिकाणी ओला गाळ सुकला
गटारीतून काढलेला ओला गाळ अनेक ठिकाणी मात्र सुकला आहे. तरीसुध्दा गाळ उचलण्यास पालिका प्रशासनाला मुर्हूत मिळेना. अशाप्रकारे गटार सफाईच्या गाळाचे ढिगारे रस्त्यावर साचून ठेवत पालिकेला यामधून काय संदेश द्यायचा आहे, असा सवाल फाईट फोर राईट फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद घोलप यांनी उपस्थित केला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close