राजकिय

हा तर छत्रपती संभाजी राजे यांचा अवमान; विरोधी पक्ष नेते दरेकर

छत्रपती संभाजी राजे यांचा अवमान करणे हे कुठल्याही सत्तेला किंवा पक्षाला शोभणारे नाही. ज्यापद्धतीने छत्रपतींचा अवमान झाला हे निश्चितच महाराष्ट्राला शोभा देणारे नाही. त्यांना अशाप्रकारे अटी, शर्ती, चौकटीत बांधणे योग्य नव्हते अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.
यापुढे दरेकर म्हणाले की, महाराष्ट्राच्या हितासाठी, स्वराज्यासाठी जे पुढे येतील ते महाराष्ट्रातील जनतेसाठी निश्चितच स्वागतार्ह असेल. आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून सुराज्य आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न होत आहे. सर्व स्तरावर देश विकासाकडे नेण्याचा प्रयत्न होत आहे. तशाच पद्धतीने महाराष्ट्रात जर स्वराज्याची कल्पना पुढे नेण्यात राजेंचा हातभार लागत असेल तर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती यांचा वारसा असणा-या राजेंचे स्वागत असेल असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सतत मी शब्द पाळणारा मुख्यमंत्री, मी बाळासाहेबांना शब्द दिलाय म्हणून सीएम झालोय असे सांगत असतात असे स्पष्ट करतानाच दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही शेतकऱ्यांच्या बांधावर काय झाले हे महाराष्ट्राने पाहिले आहे. जर छत्रपतींचे नाव घेऊन महाराष्ट्रात राज्यकारभार करत असाल तर छत्रपती संभाजी राजेंनीच अस सांगणं की, उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द पाळला नाही, यावरुन उद्धव ठाकरे यांचे वचन फसवे असते हे राजेंच्या भूमिकेच्यासंदर्भात महाराष्ट्रातील जनतेला स्पष्टपणे दिसून आल्याची टिकाही त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close