मुंबई

म्हाडा सोडतीचे अर्ज सादर करणे व अनामत रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ

मुंबई : प्रतिनिधी

कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सदनिकांसाठी जाहीर संगणकीय सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून नवीन वेळापत्रकानुसार ऑनलाइन अर्ज नोंदणी, ऑनलाइन अर्ज सादर करणे व अनामत रक्कम भरणा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार संगणकीय सोडतीकरीता ऑनलाइन अर्ज नोंदणी २९ सप्टेंबर २०२१ रात्री ११.५९ वाजेपर्यंत करता येईल. नोंदणीकृत अर्जदारांना ३० सप्टेंबर, २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येईल. ऑनलाइन तसेच बँकेत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा (EMD) भरणा १ ऑक्टोबर, २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत करता येईल.

सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या प्रारुप यादीची प्रसिद्धी आता ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in तसेच https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर केली जाणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून दावे-हरकती ५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता केली जाणार आहे, अशी माहिती कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. नितीन महाजन यांनी दिली.
संगणकीय सोडतीचा कार्यक्रम यापूर्वी निश्चित झाल्याप्रमाणे १४ ऑक्टोबर, रोजी सकाळी १० वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, हिरानंदानी मेडोस जवळ, मानपाडा, ठाणे (पश्चिम) येथे होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close