राजकिय

महापालिका निवडणूक; ३१ मे रोजी रंगशारदामध्ये आरक्षण सोडतीचा कार्यक्रम

मुंबई महापालिकेच्या सन २०२२ मध्ये होणा~या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला) , अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करण्यात येणार आहे.
तर बुधवार, १ जून रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच बुधवार, (ता. १) जून ते सोमवार, (ता.६) जूनपर्यंत आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी आहे. या सर्व सूचना व हरकती महापालिका आयुक्त, निवडणूक कार्यालय अथवा सबंधित प्रभागातील पालिका विभाग कार्यालयात दुपारी ३ वाजेपर्यंत नोंदविण्याची वेळ देण्यात आली आहे. अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close