राजकिय

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा; विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर

विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात पुराव्यानिशी नवाब मलिक यांचे बॉम्बस्फोटातील आरोपींशी झालेले व्यवहार, डी गॅंगशी असलेले संबंध याची तपशिलवार माहिती दिली होती व मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु आपली सत्ता टिकविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दबावाखाली मुख्यमत्री उध्दव ठाकरे यांनी मलिक यांचे समर्थन केले व त्यांचा राजीनामा घेतला नाही. अशी प्रतिक्रीया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधतना दिली.
सध्या ठाकरे सरकारची प्रायोरिटी ही केवळ सरकार टिकविणे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने मलिक यांचा राजीनामा घेतला नाही व जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला तर आम्ही सरकारसोबत राहणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली तर मुख्यमंत्रीच राहणार नसेल व सरकार राहणार नसेल तर राजीनामा घेउन काय करणार अशी मुख्यमंत्र्यांची अवस्था झाली असावी. आज जर खरेच शिवसेनाप्रमुखांचा ठाकरी बाणा दाखवायचा असेल व आपली प्रतिमा सांभाळायची असेल तर मुख्यमंत्र्यांनी तातडीने नवाब मलिक यांचा तात्काळ राजीनामा घेण्याचे धाडस दाखवावे. पण मला असे अजिबात वाटत नाही की मुख्यमंत्री अशा प्रकारचे धाडस करतील, असा टोलाही दरेकर यांनी यावेळी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close