मतदारांनो,मतदानाचा हक्क बजावा!

नागपूर जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन नागपूर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने मतदार जागरुकता आणि सहभाग कार्यक्रम (स्वीप) अंतर्गत जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करीत ‘मिशन डिस्टींक्शन ‘यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले […]

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी..

पंचवट :- घरगुती गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसायात व हातगाडीवर व्यावसायिक वापर होतो, तर वाहनांमध्ये देखील घरगुती गॅस सिलिंडर पलटीचे काम शहरासह देशभरात मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे बघायला मिळते. यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचे दरवाढ होत आहे. जर या घरगुती गॅस सिलिंडरचा वापर योग्य पद्धतीने झाला तर घरगुती गॅस सिलिंडर प्रत्येकाला ३०० रूपयांमध्ये मिळू शकते […]

वाढत्या वनव्यात वन,पर्यावरणाची राखरांगोळी थांबेल का?

वनव्यात रामशेज,दऱ्यादेवी मातोरी गायरान,रोहीला वनक्षेत्रासह,हरसूलघाट ही भक्ष्यस्थानी. वन,पर्यावरण खात्याला,अजून गांभीर्य आहे कुठं? नाशिक :- नाशिक जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणे यंदा ही वनव्याचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे.वनवा पर्यावरण,जैव विविधतेला जीवघेणा धोका असतानाही वनवा रोखण्यासाठीचे वन,पर्यावरण खात्याकडून वनसंरक्षण,वनवा प्रवण क्षेत्रात जाळपट्टे उभारणी,वनवा लागलेल्या ठिकाणचे नुकसानीचे ऑडिट,व वनवा लावणाऱ्यांचा शोध घेणे याकडे अजूनही गांभीर्याने बघितले जात नाही,दरम्यान यंदा तर […]

आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची मोठी संधी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक :- आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टिने नाशिक व त्र्यंबकेश्वरचा विकास होण्यासाठी आराखडा तयार करावा, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. जेणेकरून या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची संधी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मेळा बसस्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक […]

लोकसभा निवडणूक जाहीर महाराष्ट्र मध्ये होणार चार टप्प्यात निवडणूक voting loksabha election 2024

महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना सर्वच लोकप्रतिनिधी जोमाने तयारीला लागलेले आहे यामध्येच सर्व पक्षांच्या जागा वाटपाचे कोडे मात्र काही सुटेना परंतु निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या बिगल वाजले आहेत ११ एप्रिल ते २९ एप्रिल या दिवसांमध्ये लोकसभा निवडणूक घेतल्या जाणार आहेत. महाराष्ट्र मध्ये चार टप्प्यात लोकसभा निवडणूक पहिला टप्पा -11 एप्रिल:(7 लोकसभा जागा) नागपुर, […]

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त १५२ राष्ट्रीय, आंतर राष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा सन्मान

प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये मातांचाच मोलाचा वाटा – हेमंत पांडे, सहसचिव भारतीय ब्रीज असोसिएशन. नाशिक :- दिनांक १२ जानेवारी : लाख मराठा प्रतिस्टान आणि उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फौंडेशन यांच्या वतीने दर वर्षीप्रमाणे या वर्षीही राजमाता जिजाऊ जयंती निमित्त १५२ राष्ट्रीय, आंतर राष्ट्रीय खेळाडूंच्या मातांना सन्मानित करण्यात आले. यअ कार्यक्रमाचे प्रमुख आथिती भारतीय ब्रीज फेडरेशनचे सहसचिव तथा […]

रंजल्या गांजलेल्याची,मुक्या जीवाची सेवा हा भक्तिमार्गच…

नाना बच्छाव यास आद्यकवी महदंबा स्मृती पुरस्कार वितरण, गिरणारे ता नाशिक येथील दत्तजयंती उत्सवात पूज्य सुकेनेकरबाबा शास्त्रीचे निरूपण. नाशिक :- रंजल्या गांजलेल्यांची सेवा,मुक्या जीवाला आपलेसे करा हीच तर परमेश्वराची भक्ती आहे.निरपेक्ष सेवा हाच भक्तीचा मूळ पाया आहे असे निरूपण श्रीदत्त जन्मोत्सवानिमित गिरनारे तां नाशिक येथील एकमुखी दत्त मंदिर परिसरात आयोजित कवी महदंबा स्मृतिदिनी केले.यावेळी शेतकरी […]

मराठा आंदोलनात नाशिकची निर्णायक भूमिका ?

नाशिकच्या साखळी उपोषणकर्ते समर्पित,समाज विसरणार नाही, मंगळवारी शिवतीर्थावर 105 व्या दिवसी आंदोलनाची सांगता, नाशिक :- सकल मराठा समाजाची बैठक (दिनांक २३ रोजी)नाशिकच्या शिवतीर्थावर झाली.या बैठकीतमराठा क्रांतीयोद्धा मनोज जरांगे पाटील देतील त्या इशाऱ्यावर आम्ही नाशिकचा भव्य सहभाग मुंबईच्या निर्णायक आंदोलनात नोंदवेल,मुंबईपासून नाशिक जवळ असल्याने नाशिक मोठ्या संख्येने सहभागी होईल.तसेच नाशिकच्या साखळी उपोषणात मुख्य उपोषणकर्ते नाना बच्छाव […]

खान्देशी बांधव आतुरतेने वाट पाहत असलेला नाशिककरांचा लोकप्रिय खान्देश महोत्सवाचे आमदार सीमाताई हिरे यांच्या वतीने आयोजन.

नाशिक:- नाशिक शहरातील खान्देशी बांधव तसेच नाशिककरांसह जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण,असलेला खान्देश महोत्सव दिनांक २२,२३,२४, तसेच २५ डिसेंबर २०२३ लानाशिकच्या ठक्कर डोम एबीबी सर्कल, सिटी सेंटर माॅल याठिकाणी सुरुवात होत आहे.सदर महोत्सवात दि.२२ ला मराठी साहित्य अहिराणी कवी संमेलन खान्देशी बॅन्ड,कानबाई गाणे दि.२३ ला क्रांती नाना मळेगावकर न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा,दि.२४ रोजी महिला सांस्कृतिक नृत्य […]

वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यां वाहन धारकांवर ५०० रुपये दंड आकारणी करत कारवाई…

नांदगाव :- नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे इंदूर महामार्गावरील रेल्वे ओवरब्रिजचा एक भाग कोसळल्याने या घटने नंतर वाहतूकिसाठी हा रस्ता बंद करण्यात आला असून ही वाहतूक लासलगाव व विंचूर मार्गे वळविण्यात आली आसून काही मार्गे मालेगाव-नांदगाव मार्गे अहमदनगर,येवला,संभाजीनगर कडे वळवण्यात आल्याने नांदगाव येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निर्दशनास आल्याने नांदगाव हा मार्ग […]